बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपान तांबे होते. प्रभात फेरीने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यास आली. ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, सलामी व महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळेचे अहवाल वाचन शाळेचे मुख्याध्यापक कचरे सर यांनी केले.
मुलांनी सुंदर कवायत प्रकार तसेच समूह गीत गायन केले. यासाठी शाळेचे शिक्षक नांगरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिलचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष विष्णू तांबे, सदस्य योगेश तांबे, कैलास तांबे, किशोर तांबे, शरद मुंगसे, खंडेश्वर तांबे, कचरू तांबे, अमोल तांबे, भाऊसाहेब तांबे, मारुती तांबे, सोपान तांबे, कडूभाऊ तांबे, गणेश औटी, जनार्धन तांबे, निवृत्ती तांबे, तुळशीराम तांबे, गणेश तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती वेणुबाई तांबे यांनी मनोगत व्यक्त करत शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांची प्रगती, शिस्त व शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेवटी आभार प्रदर्शन नांगरे सर यांनी केले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
