बालाजी देडगाव येथे हळदी कुंकू निमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित हळदी कुंकूनिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सूर्यवंशी मॅडम  होत्या.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सुविद्य पत्नी रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील, डॉ. विद्याताई कोलते, पोटे मॅडम, अनिता गायकवाड, डॉ. भारतीताई बेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजित गवळी, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ महाराज मुंगसे, रवीभाऊ पोटे, गोरक्षनाथ नांगरे गुरुजी, भारतीय युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे ,युवा नेते निलेश कोकरे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युनूस पठाण,  शशिकांत तरमळे, संजय मुंगसे (जय हरी) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमात प्रथम बक्षीस सविता गणेश टाके (मिक्सर), द्वितीय बक्षीस वैशाली अशोक वांढेकर (इलेक्ट्रिकल शेगडी), तृतीय बक्षीस रंजना पोपट मुंगसे (जम्बो कुकर) यांनी पटकावले. तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून कावेरी किशोर मुंगसे (पैठणी), आदिकाबाई निवृत्ती टकले (पैठणी), पुंड ताई (अष्टगुण मसाले बॉक्स) यांनी बक्षीस पटकावले. यावेळी परीक्षक म्हणून योगिता हिवाळे, जया फुलारी, अनिता क्षिरसागर यांनी काम पाहिले. आलेल्या महिलांसाठी देडगाव आरोग्य केंद्राकडून डॉ. अजित गवळी, डॉ. सूर्यवंशी मॅडम, आरोग्य सेवक पप्पू नांगरे, आरोग्य सेविका कोल्हे, कदम मॅडम यांच्या सहकार्याने आरोग्य विषयी माहिती व आयुष्यमान भारत कार्डसाठी महिलांना आधार कार्ड लिंकिंग व सर्व व्यवस्था करणे यांचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळाचे मच्छिंद्र मुंगसे, निलेश कोकरे, आकाश चेडे, विठ्ठल काळे, अजित शिरसाठ, सोनाली मुंगसे, शितल कोकरे, रखमा कोकरे, शारदा काळे, मनीषा चेडे,अनिता टांगळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात बालाजी देडगाव व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.