बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी उपक्रमशील शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळविलेली कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल माका मध्ये आनंद नगरी बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भानुदास वाघ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडूभाऊ लोंढे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सागर बनसोडे ,संतोष नन्नवरे, संदीप केदार, गणेश कराळे, वासुदेव घुले, दत्तू बाचकर, विशाल पुंड, भाऊसाहेब शुळ, राजेंद्र वाघमारे यांचेसह पालक व माता पालक उपस्थित होते. आनंद मेळाव्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी फळभाज्या, पालेभाज्या, सह ढोकळा, समोसा, वडापाव, भेळ, मिठाई, शालेय साहित्याची टूमदार दुकाने थाटली होती. विद्यार्थ्यांबरोबर पालक व माता पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
खरेदी विक्रीचे ज्ञान अवगत व्हावे, गणिती क्रियांचा व्यवहारात वापर करता यावा, नफा ,तोटा समजावा, मार्केटिंग स्किल डेव्हलपमेंटसाठी हा उपक्रम राबवला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांनी दिली. सदर आनंद बाजार यशस्वीतेसाठी संस्थेच्या संचालिका मीना बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
