बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त कुकाणा (ता.नेवासा) येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर काका शिंदे यांच्या उपस्थित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नेवासा तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. तसेच उपमुख्यमंञी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, प्रताप चिंधे, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पवार,सुरेश डिके,महिला आघाडी तालुका प्रमुख शोभाताई अलवणे,राष्ट्रीय कर्मचारी शिवसेना केंद्रीय उपाध्यक्ष पुष्पा येळवंडे,नेवासा विधानसभा प्रमुख – भाऊसाहेब वाघ, प्रकाश निपूंगे,बाप्पुसाहेब दारकुंडे,अजय दौले,बंडू शिंदे,आंबदास रोडे.प्रदीप ढोकणे,सतीश कर्डीले,
नवनाथ साळुंके,संजय खरे, शंकरराव भारस्कर,किरण जाधव,विनोद ढोकणे सरपंच अशोक टेकणे,मछिंद्र कावरे कचरू भाऊ सानप,रामेश्वर शिंदे,विश्वासराव काळे,स्वप्नील मोटे,प्रमोद गजभार,विलासराव देशमुख,मछिंद्र मुंगसे,विठ्ठल काळे,निलेश कोकरे सरपंच प्रमोद गजभार,निंभारी नूतन सरपंच पल्लवी संजय पवार, दत्तू नाना पोटे, स्वप्निल जरे, दादा होण, गणेश लंघे,लक्ष्मण माकोने शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब पवार यांनी केले तर आभार संजय पवार यांनी मानले.
