बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत देडगाव, सेवा सहकारी सोसायटी, बालाजी देवस्थान ट्रस्ट, पावन गणपती देवस्थान व श्री संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा सत्कार केला. तसेच युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके होते. यावेळी बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, युवक नेते निलेश कोकरे, व्यावसायिक संघटनेचे किशोर मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी चेअरमन रामदास तांबे, व्हा.चेअरमन जनार्धन देशमुख, पावन गणपती देवस्थानचे नवनाथ मुंगसे, देविदास रक्ताटे, संजय तांबे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, संभाजी काजळे, संतोष टांगळ,
फकीरचंद हिवाळे, राजाराम महाराज मुंगसे, रामदास एडके, विठ्ठल काळे, संजय हिवाळे, मुख्याध्यापक सतीश भोसले सर, भाऊसाहेब सावंत सर, बथुवेल हिवाळे सर आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.
