बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री संत रोहिदास महाराज मंदिरात आयोजित या सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री संत रोहिदास महाराजांच्या जीवन कार्याची माहिती दिली.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन सागर बनसोडे, बळीराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे, माजी चेअरमन राजाराम मुंगसे, राजू देवा तांदळे, पांडुरंग महाराज रक्ताटे, रंगनाथ एडके, भाजपचे आकाश चेडे, कैलासनाथ मित्र मंडळाचे अरुण वांढेकर, नागेबाबाचे शाखाधिकारी पांडुरंग एडके, हरिभाऊ एडके, रामदास एडके, ज्ञानेश्वर एडके, शंकर बताडे, मोहन बताडे लखन बताडे, रमेश बताडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सागर बनसोडे, मच्छिंद्र मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, गणेश एडके सर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित व सूत्रसंचालन चर्मकार विकास संघाचे नेवासा तालुकाध्यक्ष गणेश एडके यांनी केले. तर संत रोहिदास महाराज देवस्थानचे अध्यक्ष बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमानंतर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्यावतीने अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.