बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2. महाआवास अभियान उपक्रम अंतर्गत तेलकुडगाव ग्रामपंचायत वतीने ९२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, ग्रामविकास पंचायतराज विभाग यांचेकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2.” अंतर्गत महाआवास अभियान उपक्रम निमित्त विकसित भारताचे स्वप्न घेऊन वाटचाल करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानपरिषद सभापती प्रा.रामजी शिंदे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआवास योजना कार्यक्रम पुणे बालेवाडी येथे व संपूर्ण भारतभर व जिल्ह्यासह तेलकुडगांव येथे ग्रामपंचायत तेलकुडगांव,सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक कर्मचारी वृंद वतीने या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली.
पंतप्रधान आवास योजना टप्पा-2, अंतर्गत नेवासा तालुक्यातील एकुण ५६९२ लाभार्थीपैकी तेलकुडगाव येथील ग्रामपंचायत तेलकुडगांवच्या वतीने ९२ लाभार्थ्यांना घरकुलाला मंजुरीसह प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पुणे-बालेवाडी येथील आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगांव येथे इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डवर दाखवण्यात आले. यावेळी सरपंच सतिशराव काळे पाटील यांनी प्रास्ताविक मध्ये पंतप्रधान आवास योजनेची सविस्तर माहिती लाभार्थ्यांना दिली, २०२४-२५ सालातील ९२ नवीन लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तेलकुडगाव येथील अनेक कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न यामुळे साकार होणार आहे. या योजनेंतर्गत गरजूवंत कुटुंबांना घरे मिळावीत यासाठी ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न केले आहे व पुढेही वंचित लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास उपस्थित लाभार्थी व ग्रामस्थांना दिला.
यावेळी हभप अमोल महाराज घाडगे, लाभार्थी मधून सचिन घोडेचोर, रविंद्र सोपान काळे, यांच्या सह उपस्थित महिला भगिनी आदी लाभार्थ्यांनी तेलकुडगाव ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक यांनी वेळोवेळी शासनाकडे यशस्वीपणे केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले व कौतुकाची थाप दिली. यावेळी पंचायत समितीचे श्री. तागड साहेब, ग्रामसेवक काळे बी बी भाऊसाहेब, सतिशराव काळे सरपंच, उपसरपंच शरद पा काळे, ज्ञानेश्वर पा.काळे मा.चेअरमन, बालकनाथ काळे मा सरपंच, सुरेश काळे साहेब मा सरपंच, कानिफनाथ घोडेचोर मा.उपसरपंच, अशोक काळे मा.उपसरपंच, संजय घोडेचोर, राजुकाका घाडगे, बापू गटकळ सर, दत्तात्रय काळे, सोपान शेंडगे, शैलेश देवा,गणेश घाडगे पत्रकार, प्रमोद गोसावी, कैलास सरोदे, डॉ शिलोवर्तीक, रामभान घोडेचोर, संजय काळे, बबन गटकळ, बबन भगत, बाबा गोसावी, देविदास काळे, सुदर्शन काळे, पंढरीनाथ काळे, ज्ञानेश्वर घाडगे, संतोष सरोदे, शेटे, गोरक घाडगे, मोहन तेलधुणे, कमलेश काळे पत्रकार, कृष्णा सरोदे, विरेंद्र घोडेचोर, ज्ञानेश्वर घोडेचोर, सागर सरोदे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसरपंच शरद पा काळे यांनी महाआवास अभियान उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल शासन लाभार्थी व ग्रामस्थ यांचे आभार मानले.
