जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे यावर्षीचे नवरंग कला महोत्सव 2025 लक्षवेधी ठरणार आहे . मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
‘रायरेश्वराची शपथ’ हे महानाट्य, घोडेस्वारी, एकास एक सदाबहार नृत्य ,पहाडी आवाजातील उत्कृष्ट निवेदन, बक्षिसांचा वर्षाव, बिग बॉस फेम छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांची उपस्थिती, बलून डेकोरेशन ,देखणी विद्युत रोषणाई, उत्कृष्ट आसन व्यवस्था, डीजे साउंड सिस्टीम, छोटा भीम ,मंकी , टेडी बिअर, सेल्फी पॉईंट, खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल हे सर्व सलाबतपुर , गिडेगाव, गोगलगाव, शिरसगाव ,वरखेड, माळेवाडी ,सुरेगाव , गलनिंब,खेडले काजळी, मंगळापूर ,गोगलगाव ,जळके गोंडेगाव, दिघी ,गेवराई ,म्हसले परिसरातील नागरिक पालक व विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असणार आहे, अशी माहिती स्कूलचे प्राचार्य रवींद्र गावडे यांनी दिली. या कार्यक्रमात मराठी , हिंदी, गितांसह रायरेश्वराची शपथ हे महानाट्य, लावणी, कोलिगित, नाटिका, शेतकरी गित, एकास एक रिमिक्स गीतांमध्ये नवरंग सांस्कृतिक कला महोत्सव 2025 लक्षवेधी ठरणार आहे. परिसरातील नागरिक विद्यार्थी व पालक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
