देडगाव येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ ते ११ या वेळेत येथील मारुती मंदिरासमोरील प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार्टीचे प्रमुख दत्तुभाऊ श्रीधर तिडके (गायक), सपना पुणेकर (गायक), स्नेहा पंढरपूरकर, नेहा पंढरपूरकर, जया आळंदीकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बजरंग दल, बालाजी देवस्थान ट्रस्ट, कैलासनाथ मित्र मंडळ, दत्त मंदिर संस्थान, रेणुकामाता ग्रुप देवी वस्ती, पावन गणपती देवस्थान, सावता महाराज देवस्थान तांबे वस्ती, बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यात्रा कंपनी, समस्थ ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.