युवा नेते अब्दुलभैया शेख यांची देडगाव येथील यात्रोत्सवास सदिच्छा भेट 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या मुख्य दिवशी २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते अब्दुलभैया शेख यांनी भेट दिली. यावेळी सर्वप्रथम अब्दुलभैया शेख यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. महाशिवराञोत्सवानिमित्त महादेव मंदिर व बालाजी मंदिर येथे युवा नेते अब्दुलभैया शेख यांनी दर्शन घेतले. बालाजी मंदिर येथे बालाजी देवस्थानच्यावतीने अब्दुलभैया शेख यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महादेव मंदिर येथे कैलासनाथ मित्रमंडळ व विविध संघटनाच्या वतीने युवा नेते अब्दुलभैया शेख यांचा सन्मान करण्यात आला.