आदर्श विद्या मंदिर सोनईमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)-  आदर्श विद्या मंदिर सोनईमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक खेसमाळसकर सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घुगे मॅडम यांनी केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणे व मराठी भाषेचे मायबोली गीत सादर केले. तसेच विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापक दराडे सर यांनी मराठी भाषेचा महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मराठी विषयाचे ज्येष्ठ अध्यपक खेसमाळसकर सर यांनी मराठी भाषेचे विविध दाखले देऊन मराठी भाषेचे जतन व संवर्धन कसे केले पाहिजे, याचे महत्व सांगितले. यावेळी निसर्गध मॅडम, फोपसे सर, पवार सर, आवटे मॅडम, रासणे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळवे मॅडम यांनी केले.आभार पवार सर यांनी मानले.