चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला दिन व माता पालक मेळावा उत्साहात

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावारूपाला आलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन व माता पालक मेळावा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रवींद्र गावडे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सोनल मयूर वाखुरे (ज्येष्ठ कायदेतज्ञ) व डॉ. मनीषा भाऊसाहेब वाघ (स्त्री रोग तज्ञ व आरोग्य समुपदेशक) या होत्या.
डॉ. मनीषा वाघ यांनी आपल्या मनोगतातून महिलांना ‘निरोगी आरोग्य’आणि आहार याविषयी मार्गदर्शन केले. महिला पालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण केले. महिलांसाठींच्या कायद्यात अनेक कलमे आहेत, महिलांसाठीचे राष्ट्रीय धोरण व सक्षमीकरण घडवून आणणे, राष्ट्रीय महिला आयोग याविषयीचे मार्गदर्शन जेष्ठ कायदेतज्ञ ॲड.सोनल वाखूरे यांनी केले.
महिला दिनानिमित्त माता- पालक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महिला दिन व माता पालक मेळावा संपन्न झाला.
शाळा वर्षभर घेत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल माता पालकांनी समाधान व्यक्त केले व सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमा कुऱ्हाडे, रेणुका गोरे, छाया लालझरे, नीता परदेशी, सोनाली सय्यद, मीनाक्षी तांबे, सुप्रिया लिंबे, छाया निकम, श्री संतोष निकम, शाहरुख सय्यद, निलेश निधाने, संजय गरुटे,कैलास तांबे, अशोक मगर, विजय साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक छाया निकम यांनी केले. शेवटी आभार रेणुका गोरे यांनी मानले.