बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून देडगाव येथे कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील कृषिदुतांनी गावातील विविध ठिकाणी स्वच्छता करत पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कृषिदूत, विद्यार्थी, आणि ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी बालाजी देडगाव येथील कैलासनाथ कृषी सेवा केंद्राचे सागर मुंगसे, गोयकर, फुलारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय भानसहिवरे कृषिदूतांच्या आणि येथील ग्रामपंचायतच्या पुढाकाराने करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे पर्यावरणाविषयी जनजागृती वाढली असून, ग्रामस्थांनी दरवर्षी हा उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.
