बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जमिनीची मशागत, योग्य वाणाची निवड, खत पाणी व्यवस्थापन करून एका एकरात २.५ (अडीच) किलो वजनाचे ४० हजार ऊस संख्या ठेवली तर एकरी १०० टन उत्पादन नक्की मिळेल, असे ठाम प्रतिपादन ऊस पिक शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी केले. भेंडा (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधवारी ३ सप्टेंबर रोजी बालाजी देडगाव येथील महादेव मंदिर सभामंडपात ऊस पिक परिसंवाद व शेतकरी मेळावा संपन्न झाला, त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना माने बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडूरंग अभंग, संचालक अॅड. देसाई देशमुख, डॉ. क्षितीज घुले पाटील, काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, काशिनाथ नवले, दादासाहेब गंडाळ, प्रा. नारायण म्हस्के, बबनराव भुसारी, भाऊसाहेब कांगुणे, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, जनार्दन कदम, सखाराम लव्हाळे, विकास नन्नवरे, विष्णुपंत जगदाळे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रविंद्र मोटे, कृषि विज्ञान केंद्रप्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक, बाजीराव मुंगसे, कारभारी चेडे, सुखदेव महाराज मुंगसे, चंद्रकांत मुंगसे, प्रभाकर कोलते, अजित मुरकुटे, संतोष म्हस्के आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील म्हणाले, आपला ज्ञानेश्वर कारखाना सर्व दृष्टिने परिपूर्ण झालेला आहे. हंगाम सुरु होण्याचे पहिल्या दिवसापासून दररोज ९५०० मेट्रीक टन ऊस गाळप व दीड लाख लीटर इथेनॉलची निर्मिती होईल. आता केवळ ऊसाला भाव द्यायचा आहे. तुम्ही एकरी ऊस उत्पादन वाढवा, आपण सगळ्यात चांगला भाव देऊ अशी ग्वाही देवून लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांच्या जयंतीदिनी १५ सप्टेंबर रोजी एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची घुले यांनी सांगितले. जैव शास्त्रज्ञ डॉ. भास्कर ताकटे यांनी कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या जैविक खतांची माहिती व त्याचा वापराने होणारा फायदा यांची माहिती दिली. या ऊस परिसंवादास कडूभाऊ तांबे, बन्सी मुंगसे, बाबासाहेब मुंगसे, साहेबराव कदम, कुंडलीक कदम, हनुमंत गटकळ, सुनील मुथा, एकनाथ भुजबळ, देवीदास पाटेकर, अंबादास कळमकर, बबनराव भानगुडे, भगवान गंगावणे, गोरक्षनाथ काळे, कुमार नवले, हरिभाऊ नवले, कचरदास गुंदेचा, वैभव नवले, आप्पासाहेब देशमुख, दत्ता मुंगसे, हनुमंत गटकळ, दिगंबर ताके, रामकृष्ण नवले, सागर बनसोडे, नवनाथ मुंगसे, राजेंद्र कदम, हरिभाऊ मुंगसे, अरुण वांढेकर, नवनाथ मुंगसे, हरिभाऊ देशमुख, मुख्य शेतकी अधिकरी सुरेश आहेर, प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के, सिव्हिल इंजिनियर सुधाकर ढाकणे आदिंसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अंभग यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रा.नारायण म्हस्के यांनी आभार मानले.