बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरा या परिसरातील पावन महागणपती देवस्थान येथे गणेशोत्सवानिमित्त शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, महंत आदिनाथ महाराज शास्त्री, महंत सुनीलगिरी महाराज, हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या उत्सवात महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी येत आहे. दररोज महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमाचे करण्यात आले आहे.
या उत्सवकाळात शनिवारी (दि.६) सकाळी ९ ते ११ या वेळेत युवा कीर्तनकार हभप बाबासाहेब महाराज मतकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पावन महागणपती देवस्थान हे नवसाला पावणारे देवस्थान अशी परिसरात ख्याती आहे. येथे दर महिन्याला चतुर्थी निमित्त भोजनाची व्यवस्था, भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते. गणेश उत्सवानिमित्त आयोजित काल्याच्या किर्तनसेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पावन गणपती देवस्थान व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव यांनी केले आहे.
