माका महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून तृतीय व द्वितीय वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम उत्कृष्टरित्या पार पाडले . प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भूमिका उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांनी पार पाडली. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी करिश्मा शेख, साक्षी धरम, प्रा. मंदार कुलकर्णी व डॉ. अमोल दहातोंडे यांनी आपले मनोगते व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा. तसेच गुरुजनांच्या योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेवून ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने योग्य मार्गाने वाटचाल करावी. तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात प्राध्यापक व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक वैष्णवी बोरुडे हिने केले. तर अध्यक्षीय सूचना अदिती गायकवाड हिने मांडली, तर अनुमोदन दिपाली तमनर हिने दिले. सूत्रसंचालन अश्विनी बोरूडे हिने केले. त्याचप्रमाणे आभार वैष्णवी लोंढेने मानले. कार्यक्रमाच्या नियोजनात प्रा. शाहबाज सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक उपस्थित होते.