बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या शुभहस्ते गंगेच्या पाण्याने स्नान व दुग्धभिषेक घालण्यात आला.यावेळी देवा तांदळे यांच्या वेदमंत्राच्या साह्याने विधिवत पूजा करण्यात आली. पूजेसाठी हभप सुखदेव महाराज मुंगसे यांना मान देण्यात आला होता तर शिवसैनिकांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवरायांच्या आरतीने परिसर शिवमय झाला होता. त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तर यावेळी मच्छिंद्र मुंगसे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दहा लक्ष रुपये निधी दिला आहे. लवकरच सुशोभीकरणाचे काम सुरू होईल व एक आगळीवेगळी वास्तू उभा राहील. यावेळी हभप सुखदेव महाराज यांनी छत्रपती शिवरायांचे विचार थोडक्यात मांडले. तरुणांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांचे आचरण करावे,असे प्रतिपादन सुखदेव महाराज मुंगसे यांनी केले.
आलेल्या शिवसैनिकांचे युवा नेते निलेश कोकरे यांनी आभार मानले. यावेळी जनार्धन मुंगसे, सूर्यभान सोनवणे, रघुनाथ कुटे पुढारी, भाजपचे उपाध्यक्ष आकाश चेडे, बन्सी मुंगसे, नारायण मुंगसे, मुरलीधर आप्पा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर खांडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, चोपदार नारायण मुंगसे, पत्रकार इंनुस पठाण, आष्टेकर मामा, प्रगतशील शेतकरी बंडू मुंगसे, शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष एकनाथ फुलारी, संकेत मुंगसे, हवालदार पठाण, इस्माईल पठाण, बाळासाहेब वांढेकर, अरुण वांढेकर, जगदीश कदम, श्रावण औटी आदी शिवभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

