युवा नेते महेश उगले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील ग्रामपंचायत सदस्य व जगदंब प्रतिष्ठाणचे अध्यक्ष युवा नेते महेश गुलाबराव उगले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
युवा नेते महेश उगले यांनी वाढदिवसानिमित्त इतर खर्चास फाटा देऊन सामाजिक उपक्रम म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताके वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिंधे वस्ती व श्री नरेंद्र महाराज हायस्कूल जेऊर हैबती येथे प्रत्येक विद्यार्थ्यांना वह्या, पेन, मिठाई वाटप केले. तसेच कचरामुक्त गाव करण्यासाठी गावातील प्रत्येक घरात, प्रत्येक दुकानात कचराकुंडी (डस्टबिन) वाटप करून वाढदिवस साजरा केला. यासाठी जगदंब प्रतिष्ठानचे सर्व सहकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. यापूर्वीही युवा नेते महेश उगले यांनी वृक्षारोपण, जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा, अनाथ आश्रमात अन्नदान, दवाखान्यासाठी आर्थिक मदत, असे विविध उपक्रम जगदंब प्रतिष्ठान मार्फत राबवले आहेत. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.