जनशक्ती, वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील आयएसओ मानांकन प्राप्त असलेली व गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. यात श्रेयश अप्पासाहेब गोरे, गायत्री गणेश काळे, आस्था राजेंद्र मते, सिद्धार्थ रामनाथ साळुंके या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. चाईल्ड करिअर इंग्लिश स्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसह इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते, त्यासाठी वेगळे अध्यापन वर्ग वर्षभर सुरू असतात. पालकांचा विश्वास व शिक्षकांचे परिश्रम यामुळे अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत सदर शाळेचे दरवर्षी अनेक विद्यार्थी चमकदार कामगिरी करतात, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे यांनी दिली. या विद्यार्थ्यांना शिक्षक संजय गरुटे, संदीप खाटीक, अमोल इंगळे, विजय खाटीक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे, संचालिका मिना बनसोडे यांनी अभिनंदन केले.
