देडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक सोहळा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मधुकर क्षीरसागर व विठ्ठल क्षीरसागर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनीलशेठ मुथ्था, रामभाऊ कुटे, बाळासाहेब कुटे, जनाभाऊ मुंगसे, राजाराम महाराज मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, बाळासाहेब वांढेकर, गंगाराम तांबे, शिवाजी बनसोडे, आदिनाथ बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी उपस्थित सर्व शिवभक्तांचे आभार मानले. अनेक शिवभक्तांनी यावेळी सहभाग नोंदवला.