बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कदम वस्ती शाळेचे आदर्श शिक्षक सुनील गायकवाड सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तर विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गायकवाड सर यांचा सत्कार केला.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, माजी सरपंच दत्ता मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, शिक्षक नेते संजयकुमार लाड, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, माजी चेअरमन भानुदास मुंगसे, पत्रकार इंनुस पठाण, नामदेव वांढेकर, मधुकर क्षीरसागर, युवा नेते निलेश कोकरे, आकाश चेडे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, गोकुळ वांढेकर, अशोक मुंगसे, गणेश औटी, संजय ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.


