बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या सुवर्णदिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे विचार व्यक्त करताना म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या धाडसी व कर्तृत्ववान मुली घडल्या पाहिजेत. तसेच स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच प्रा. डॉ. दहातोंडे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अजित हरिश्चंद्रे व प्रा. शहाबाज सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच प्राध्यापकेत्तर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


