बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबादप्रमाणे १० वर्षापासून शिवशक्ती तरुण मंडळ व कुकाणा रोड कुटे वस्ती ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यामाने हनुमान जयंती उत्सवानिमित्त महंत गुरुवर्य हभप भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताह काळात दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हभप कविताताई कदम, हभप गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे, हभप भागवतानंद कन्या सविताताई महाराज दरंदले, हभप वाणीभूषण आदिनाथ महाराज निकम, हभप भागवताचार्य आरतीताई महाराज शिंदे, हभप सोमनाथ महाराज खाटीक, हभप भागचंद महाराज पाठक यांचे ८ ते १० या वेळात किर्तन झाले असून काल्याचे किर्तन हभप श्रीधर महाराज शिंदे यांचे झाले असून दहीहंडी फोडून सप्ताहाची सांगता झाली आहे.
हा सप्ताह यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शिवशक्ती तरुण मंडळाचे चेअरमन बंडुभाऊ कदम, महादेव खांडे, राम कुटे, आजिनाथ लाडके, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास काकडे, बापू कुटे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामनाथ गोयकर, दूध डेअरीचे चेअरमन प्रशांत कदम, कांदा व्यापारी हरीभाऊ तागड, सोसायटी संचालक संदिप कुटे, कांदा व्यापारी रामा पंडीत, अनिल घोडके, वैभव कदम, मृदुंग वादक महादेव कुटे, हार्मोनियम वादक रामेश्वर घोडके, बबलू कुटे, संतोष कुटे, जालिंदर लाडके,गणेश खांडे, भावराव खांडे, अंबादास मुंगसे, हभप कविताताई कदम व हभप मीनाताई कुटे यांनी सहकार्य करत मोलाचे कष्ट घेतले. तर जेऊर हैबती भजनी मंडळ, बालाजी देडगाव भजनी मंडळ यांच्यावतीने भव्य आयोजन करण्यात आले होते.
