नेवासा फाटा (प्रतिनिधी)- त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सी.बी.एस.ई इंग्रजी माध्यमाच्या फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यालयाचा कॅडेट गोरे यश याने ८९.०० % मिळवून विद्यालयात प्रथम तर कॅडेट मोरे सदाशिव याने ८७.६०% गुण मिळवून द्वितीय तर कॅडेट हिवाळे फ्रँकोई हिने ८२.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. ७० टक्केच्या पुढे विद्यालयाचे आठ विद्यार्थी आहेत. या सर्वांना लिनो, मगर प्रतीक, खैरे योगेश, चायल सत्यम, जयस्वार, गायकवाड काकासाहेब यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक साहेबरावजी घाडगे पाटील, अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण पाटील, सचिव मनीष घाडगे पाटील, प्राचार्य जितेंद्र पाटील, प्राचार्य सोपान काळे, प्राचार्य सचिन कर्डिले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
