बालाजी देडगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देडगाव या ठिकाणी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव या ठिकाणी सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, माजी सभापती कारभारी चेडे, ज्ञानेश्वर लचे संचालक जनाकाका कदम,मंडळ अधिकारी खंडागळे भाऊसाहेब, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे, बन्सी मुंगसे, काळे मेजर, सोमनाथ मुंगसे मेजर, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, महादेव पुंड, सुनीलशेठ मुथा,पोपट मुंगसे, विश्वास हिवाळे, तांदळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाणे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, अरुण वांढेकर, शुभम तिडके, प्रेमचंद हिवाळे, मुख्याध्यापक सतीशकुमार भोसले सर, सावंत सर, कडू सर, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश तांबे, बाळासाहेब म्हस्के, संजू कुटे, शिवाजी ससाणे, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी उपस्थित होते.