बालाजी देडगाव येथे लाडक्या बहिणींचे हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ आयोजित हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
येथील बालाजी मंदिर सभामंडपात आयोजित या कार्यक्रमासाठी रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील, जयाकाकी सुनीलभाऊ लंघे पाटील, मयुरी गणेश दीक्षित, डॉ. शितल वेताळ, अर्चनाताई क्षीरसागर, शितल कोकरे, सोनाली मुंगसे, शारदा काळे, अनिता टांगळ, बेबीताई संजय घोडेचोर, सुनिता दत्तात्रय काळे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळाचे मच्छिंद्र मुंगसे, विठ्ठल काळे, राहुल कुटे, सोसायटीचे चेअरमन सागर बनसोडे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, जनार्दन मुंगसे, बाळासाहेब मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार इंनुस पठाण, चांगदेव तांबे, संजय घोडेचोर, रवी पोटे, महेंद्र दारकुंडे, जय हरी मुंगसे, दत्तू राजे काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमांमध्ये प्रतीक्षा प्रदीप कदम, अर्चना वैभव दानी, मनीषा योगेश लाड, अनिता बाळासाहेब मुंगसे, पपिता अक्षय तांदळे या महिलांनी पैठणी जिंकल्या तर प्रतिभा घनश्याम नांगरे, अर्चना राजेंद्र कोकरे, मंजुषा रमाकांत, वैशाली मुंगसे या महिलांनी इतर बक्षिसे जिंकली.

यावेळी देडगाव व परिसरातील लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार इंनुस पठाण यांनी केले.