बालाजी देडगाव येथे उद्या निरंकारी सत्संगाचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे कृपेने संत निरंकारी मंडळाच्या उदात्त भावनेतून समस्त मानवाला ईश्वरीय ज्ञानाची अनुभूती यावी आणि भगवान परमात्म्याला जाणून त्याची भक्ती व्हावी या उद्देशाने ब्रह्मज्ञानाच्या प्रचार-प्रसार कार्यासाठी सालाबादप्रमाणे बालाजी देडगाव येथे उद्या १७ मे शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजता मारुती मंदिर येथे प.पु. हेमंत महाराज खेडेकर , पुणे यांचे प्रमुख उपस्थितीत वार्षिक निरंकारी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी या सत्संग-प्रवचन कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे सोनई शाखेचे मुखी विठ्ठल महाराज खाडे , तसेच देडगावचे प्रबंधक राजाराम मुंगसे यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर भाविकांसाठी प्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे.