ख्रिस्तवासी बबनबाई सत्यदान हिवाळे यांच्या स्मरणार्थ उपकार स्तुती प्रार्थनेचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील देडगाव येथील ख्रिस्तवासी बबनबाई सत्यदान हिवाळे यांच्या स्मरणार्थ उपकार स्तुती प्रार्थना व विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ख्रिस्तवासी बबनबाई सत्यदान हिवाळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी १७ व १८ मे रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. देडगाव व परिसरातील भजनी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवारी १८ मे रोजी सकाळी ९ वाजता फुलांचा विधी करण्यात येणार असून यावेळी देवाचे सेवक, पास्टर व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन देवदान सत्यदान हिवाळे, संजय सत्यदान हिवाळे, विजय सत्यदान हिवाळे, रजनीकांत सत्यदान हिवाळे व अलका सुधीर शहाराव यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी या उपकार स्तुती प्रार्थना कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती केली आहे.