तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलची एसएससी परीक्षेत गरुडझेप 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मीडिअम स्कूलने दहावीच्या उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तक्षशिला इंग्लिश मीडिअम स्कूलने शंभर टक्के निकालासोबतच उत्तुंग असे यश मिळवले आहे. यामध्ये राऊत ऋतिका नितीन या विद्यार्थिनीने 93.40 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर म्हस्के प्रांजल गणेश या विद्यार्थिनीने 93.20 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. तर लाडके वैष्णवी गणेश हिने 92.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन करून यश मिळवले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम, संचालिका शुभांगी कदम, समन्वयक कल्पना पवार, प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.