मान्सून २४ तासांत केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रातील प्रवास कसा असणार, घ्या जाणून

महाराष्ट्र

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी गुड न्यूज समोर येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रचंड आनंद झाला आहे. भारतीय हवामान खात्याने नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मान्सून केरळात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मान्सून दाखल होण्यासाठी अरबी समुद्र आणि हिंदी महासागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळात दाखल झाल्यानंतर पुढील १० ते ११ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. सध्या मुंबईत उष्ण वारे वाहत असून विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे. मात्र पुढील दोन दिवसांत विदर्भातील तापमान कमी होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा देशामध्ये १०६ मिलिमीटर इतका पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना आनंद झाला आहे. कारण उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक मान्सूनची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत.मान्सून वेळेआधी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता मान्सून २४ तासांच केरळमध्ये दाखल होणार असल्याची बातमी ऐकून सर्वांनाच आनंद झाला आहे. आता लवकरच नागरिकांची उकाड्यातून सुटका होणार आहे. मान्सून अंदमानामध्ये दाखल झाला असून आता तो २४ तासांमध्ये केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर हळूहळू पुढे सरकत १० ते ११ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. मुंबईमध्ये मान्सून १० ते ११ जूनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.