बालाजी देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी ): नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे होते. तर जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड यांनी केले. तर पत्रकार युनूस पठाण, युवा नेते निलेश कोकरे व ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. यानिमित्ताने शाळेचे पर्यवेक्षक सर्जेराव चामुटे हे वयोमानाने सेवानिवृत्त झाले असून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करून त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या जयंतीनिमित्त सरपंच चंद्रकांत मुंगसे, खरेदी-विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, दक्ष पोलीस मित्र समितीचे अध्यक्ष शहादेव मुंगसे, बालाजी युवा मंचाचे अध्यक्ष पोपटराव बनसोडे, रामचंद्र कदम, शाळेचे शिक्षक सर्जेराव चामुटे, ज्ञानदेव कदम, सचिन कोठुळे, गणेश मुंगसे, हरिभाऊ भुजबळ, अक्षय मिरपगार, बाबासाहेब गोयकर, सुरेंद्र बनसोडे, दत्तात्रय तोडमल, सुभाष कोलते, आबासाहेब काकडे, सोमनाथ फुलारी मामा, शशिकांत वागस्कर, लक्ष्मण दसपुते , प्रवीण मुंगसे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.