बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनसोडे वस्ती येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली जावळे, माजी उपसरपंच लक्ष्मण गोयकर, नवनाथ मुंगसे, नवनाथ बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे मॅडम यांनी प्रास्ताविक केले तर संजय गर्जे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
