देडगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत केले करण्यात आले. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. तसेच मोफत बुट व सॉक्सचे वितरण करण्यात आले. याचबरोबर मागील वर्षांसारखे दोन मोफत गणवेश देखील शासन सर्व विद्यार्थ्यांना पुरवणार आहेत. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाणे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, कुकाणा व देडगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख कमल लाटे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी सर्वांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व उपस्थित पालकांना देखील शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बथुवेल हिवाळे सर व भाऊसाहेब सावंत सर यांनी केले. तर मुख्याध्यापक सतिश भोसले सर यांनी आभार मानले.