बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी ज्ञानदेव कदम सर यांची पदोन्नती झाली आहे. या पदोन्नतीबद्दल बालाजी देडेगाव येथे पत्रकार बन्सीभाऊ एडके व पत्रकार इन्नुस पठाण यांच्या वतीने कदम सर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य स्वरुपचंद गायकवाड सर आदी शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते. कदम सर यांच्या प्रदिर्घ अशा अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याची भावना यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी व्यक्त केली. याप्रसंगी ज्ञानदेव कदम सर यांनी शाळेच्या प्रांगणात 21 केशर आंब्याचे वृक्षारोपण करून कार्यभार स्वीकारला. पत्रकार इन्नुस पठाण यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.
