इंगळेनगर शाळेने वृक्षदिंडी काढून केली पर्यावरण जनजागृती

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील चांदा केंद्रांतर्गत येणाऱ्या इंगळेनगर जिल्हा परिषद शाळेने आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी काढून शालेय परिसरात वृक्षारोपण केले. जनजागृतीचे फलक हातात घेवून व वृक्ष डोक्यावर घेवून शालेय परिसरात काळाची गरज ओळखून पर्यावरणा रक्षणाचा एक चांगला संदेश या निमित्ताने दिला. या वृक्षदिंडीचे आयोजन उपक्रमशील शिक्षक संदिप भालेराव यांनी केले. तर शाळेचे मुख्याध्यापक नरवडे सर व पालक सागर डुकरे यांनी मुलांना मिठ्ठान भोजन दिले. मुलांनी लेझीम व फुगडी या पारंपारिक खेळाचा आनंद लुटला. या वृक्षदिंडीचे शिवाजी कराड साहेब गटशिक्षणाधिकारी नेवासा व केंद्रप्रमुख एन डी दहातोंडे यांनी कौतुक केले. यावेळी मंजाबापू जऱ्हाड , सुनिल बर्डे , विजू इंगळे, संदिप ढमाळ , रविंद्र इंगळे ,धनंजय इंगळे , विक्रम कोकरे , योगेश धुमाळ , सचिन झाडगे व महिला पालक उपस्थित होते.