बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- एक कृतज्ञतेचा भाव मनात ठेवून ज्येष्ठ नागरिकांचा केलेला सन्मान व त्यानंतर मिळालेले आशिर्वाद हे माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नाहीत, तसेच या “जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याच्या” निमित्ताने आपल्या सर्वांची सेवा करण्याची मला संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे, असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे शारदाताई फाउंडेशनच्या वतीने व महाराष्ट्र राज्याचे माजी मृद जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाने वृद्धांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला, यावेळी त्या बोलत होत्या. येथील बालाजी मंदिर सभागृहात झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुखदेव महाराज मुंगसे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य दत्तूभाऊ काळे, युवा नेते उदयनदादा गडाख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. या सोहळ्यानिमित्त देडगाव परिसरातील ४०० वृद्धांचा शाल, फेटा, सन्मानचिन्ह व हार घालून सन्मान करण्यात आला.
यावेळी देडगाव ग्रामस्थांच्या वतीने शारदाताई फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीताताई गडाख यांचा व प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख, युवा नेते उदयनदादा गडाख, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, डॉ. संतोष फुलारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, शारदाताई फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा अतिशय आदर्श व अनुकरणीय आहे. गडाख परिवार हा नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतो. या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या फाउंडेशनचे व गडाख परिवाराचे मी अभिनंदन करतो, तसेच त्यांना सामाजिक कार्यास शुभेच्छा देतो.
यावेळी उषाताई गडाख, मुळा संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा पांढरे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार विनायक दरंदले , अहिल्याबाई होळकर शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड, माजी उपसभापती कारभारी चेडे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे , माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी सरपंच एकनाथ भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पंचायत समिती सदस्य वैशालीताई एडके, युवा नेते श्रीकांत हिवाळे, माजी चेअरमन निवृत्ती मुंगसे, माजी चेअरमन संतोष तांबे, माजी चेअरमन योसेफ हिवाळे, गणपती देवस्थानचे विश्वस्त अशोकराव मुंगसे, किशोर मुंगसे, भारत कोकरे, उपसरपंच महादेव पुंड, सागर बनसोडे , माजी सरपंच रामेश्वर गोयकार, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, पत्रकार युनूस पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुक्यातून आलेले ज्येष्ठ नागरिक, शारदा फाउंडेशनचे सदस्य, अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे शिक्षक वृंद, देडगाव ग्रामस्थ, सोहळ्याचे सत्कारमूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना शारदाताई फाऊंडेशनच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या सन्मान सोहळ्यामुळे ज्येष्ठ नागरिक भारावून गेले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेवन्नाथ पवार यांनी केले तर आभार गणेश एडके यांनी मानले.