तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगावचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच शाश्वत विकास करण्याच्या संकल्पनेतून सतरा मुलभूत ध्येये आणि नऊ थीम्स, नवभारताच्या संकल्पनेवर भर देऊन तेलकुडगावच्या सर्व क्षेत्रात त्यामध्ये पायाभूत सुविधायुक्त गाव, सुशासन युक्त गाव, जलसमृध्द गाव, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव त्यामध्ये अंगणवाडी विभाग, शैक्षणिक क्षेत्र, पाणीपुरवठा विभाग, सामाजिक दृष्ट्या गाव सुरक्षित ठेवणे अशा विविध संकल्पना समोर ठेवून तेलकुडगाव सशक्त, सुरक्षित व सक्षम बनविण्यासाठी तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये महादेव मंदिर देवस्थान परिसरतील रोडसाठी पेव्हींग ब्लॉक बसवणे (२.२७२३६/-), व्यायाम शाळा दुरूस्त करणे (८४,६०८/-), श्रीरामनगर वैंकुठधाम स्मशानभुमी दुरूस्त करुन कचखडी/ पेव्हिंग ब्लॉक टाकणेव साफसफाई करणे (१.२३४५२/-), गावठाणमध्ये बंदिस्त गटार (२०६११८/-), तेलकुडगाव कार्यक्षेत्रातील देवस्थान व ठराविक ठिकाणी बाकडे बसविणे (१७५१२०/-), आखतवाडे रोड अंगणवाडी शौचालय (१३००००/-), मातंग समाज स्मशानभूमी हातपंप (१०००००/-), श्रीरामनगर वैकुंठधाम हातपंप (१०००००/-), साफसफाई व घनकचरा व्यवस्थापनसाठी छोट्या मोठ्या व्यावसायीकांना बकेट डस्बीन वाटप (४७०००/-) ही कामे करण्यात येत आहेत. तसेच जि.प.प्राथ.शाळा काळे वस्ती सार्वजनिक शौचालय (३७००००/-),
जि.प.प्रा.शाळा हनुमाननगर सार्वजनिक शौचालय (५५००००/-) या कामांचे लोकार्पण करण्यात आले. ही सर्व कामे ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येत आहेत.
या शुभारंभप्रसंगी सरपंच लताताई सतिशराव काळे, उपसरपंच सुरेखा शरद काळे, मा. सरपंच रंजना बालकनाथ काळे, मा.सरपंच अर्चना सुरेश काळे, उपसरपंच अशोकराव काळे, उपसरपंच एकनाथ घोडेचोर, ग्रामसेवक बी.बी काळे भाऊसाहेब,  हभप जयाताई महाराज घाडगे, गुंफेकरताई, नारायण  काळे, रेवन्नाथ काळे, मच्छिंद्र काळे, हभप नवनाथ महाराज घाडगे, ज्ञानेश्वर काळे मा.चेअरमन, साईनाथराव काळे, बालकनाथ काळे, सुरेश काळे साहेब, बाबुराव काळे, बाबासाहेब काळे सर, सुनील राजहंस, संभाजी शेटे, सतिशराव काळे, शरद काळे, पो.पा. शिवाजी घोडेचोर, संजय घाडगे, दिपक घाडगे, सुर्यभान घोडेचोर, भाऊसाहेब काळे, मोहनराव काळे, भगवान गटकळ, कांतीलाल काळे, ज्ञानदेव काळे आप्पा, मकरंदराजे राजहंस, रविंद्र काळे, बाळासाहेब काळे, दानियल साळवे, नामदेव म्हस्के, छानदेव घोडेचोर, प्रसाद घोडेचोर, सुदाम काळे, बद्रीनाथ काळे, शोरात आदिनाथ, सोपानकाका घाडगे, सोपान शेंडगे, बाळासाहेब घाडगे, दत्तुराजे काळे, शहाराम घोडेचोर, नरेंद्र घोडेचोर, पोपट सरोदे, अमोल म्हस्के, रमेश घोडेचोर, गौतमशेठ गुगळे, प्रशांतकाका कुलकर्णी, शैलैश देवा, ललित उनवणे, हरिश्चंद्र काळे, योगेश उनवणे, काळे डाॅक्टर, शेषराव घोडेचोर, आकाश दुधाडे, शिवाजी उनवणे, गावातील सर्व छोटे-मोठे व्यावसायिक बंधू आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.