बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती येथील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने श्री क्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सावता मंदिर देवस्थानच्या वतीने महाराजांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले की, कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी या अभंगाने जगभरात संत सावता महाराज यांच्या कार्याची आठवण येते. संत सावता महाराज यांच्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र दिसतो. या गावात भाविकांनी संत सावता महाराजांचे सुंदर असे मंदिर बांधून या परिसरातील वातावरण प्रसन्न केले आहे, अशा शब्दात महाराजांनी तांबे परिवाराचे कौतुक केले. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सभापती कारभारी चेडे, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, हभप पांडुरंग महाराज रक्ताटे, आसाराम पाटील मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, मुरलीधर दहातोंडे सर, जनार्धन तांबे ,बंडू तांबे, तुळशीराम तांबे, देवस्थानचे अध्यक्ष अशोक तांबे, शरद तांबे, निवृत्ती तांबे, संतोष तांबे, राजू तांबे, नवनाथ तांबे, नवनाथ महाराज मुंगसे,
ओमकार तांबे, अमोल तांबे, रामकिसन तांबे, अंबादास तांबे, पप्पू तांबे, चांगदेव तांबे, सोपान तांबे, सर्व विश्वस्त तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
