तांबे वस्ती येथील सावता महाराज मंदिर सभामंडपाचे उद्या लोकार्पण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सावता महाराज मंदिर, तांबे वस्ती येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या ४० लक्ष रुपये किमतीच्या सभा मंडपाचे लोकार्पण उद्या दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.
माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख व हभप गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी चेअरमन संतोष तांबे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब असतील. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून महंत सुनीलगिरीजी महाराज, हभप गणेश महाराज चौधरी, हभप अंकुश महाराज कादे, हभप बाबासाहेब महाराज घाडगे, हभप भागचंद महाराज पाठक, हभप सुखदेव महाराज मुंगसे, माजी सभापती कारभारी जावळे, कॉन्टॅक्टर रामचंद्र रेपाळे साहेब, आबासाहेब काळे पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तांबे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.