बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे सालाबादप्रमाणे संत सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य हभप मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. हा सप्ताह 38 वर्षापासून अखंड चालत आलेला असून याही वर्षी सप्ताहात नामांकित महाराजांची किर्तनरुपी सेवा पार पडली. सांगता समारंभाच्या आदल्या दिवशी संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची फटाक्याच्या आतषबाजीमध्ये व हरिनामाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी मीराबाई महाराज म्हणाल्या की, संत सावता महाराज यांचा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी यातून सावता महाराजांचे कर्म दिसून येते. सर्वांनी यांचा आदर्श घेऊन काम करावे. मागील चाळीस वर्षापासून या सप्ताहात माझा सहभाग आहे. दरवर्षी हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
यावेळी महंत सुनीलगिरी महाराज, हभप गणेश महाराज चौधरी, हभप अंकुश महाराज कादे, हभप सुखदेव महाराज मुंगसे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी सभापती कारभारी जावळे, कॉन्ट्रॅक्टर रेपाळे साहेब, भैय्यासाहेब देशमुख, एकनाथराव कावरे, एकता परिषदेचे पप्पू जावळे, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे, माजी उपसभापती कारभारी चेडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, चेअरमन बाबासाहेब मुंगसे, एकनाथ भुजबळ, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, बन्सी मुंगसे, हभप पांडुरंग रक्ताटे, माजी सरपंच दत्ता मुंगसे यांची उपस्थिती लाभली. तर माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, जनार्धन तांबे बंडू तांबे ,तुळशीराम तांबे, देवस्थानचे अध्यक्ष अशोक तांबे, शरद तांबे, निवृत्ती तांबे ,बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, राजू तांबे ,नवनाथ महाराज तांबे ,बाबासाहेब तांबे ,ओंकार तांबे, अमोल तांबे ,रामकिसन तांबे ,राजू तांबे ,अंबादास तांबे, पप्पू तांबे ,चांगदेव महाराज तांबे, सोपान तांबे व देवस्थानचे सर्व विश्वस्त व सर्व तांबे परिवार यांनी सोहळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी योगदान दिले.
यावेळी परिसरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.