बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- कोणत्याही कार्याची ठराविक वेळ यावी लागते. ४० वर्षांपूर्वी या सप्ताहाची सुरुवात ताडपत्रीच्या मंडपामध्ये करण्यात आली होती. परंतु आज आमदार शंकरराव गडाख यांच्या ४० लाखाच्या निधीतून भव्य दिव्य असा सभामंडप तयार झाला, हे कार्याचे फलित आहे. त्यांनी फक्त बोलून दाखवले नाही तर प्रत्यक्ष कृतीतून दाखविले, असे प्रतिपादन मिराबाई महाराज मिरीकर यांनी केले.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहची सांगता हभप मिराबाई महाराज मिरीकर यांच्या कीर्तनाने झाली, यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून सावता महाराज मंदिरासाठी ४० लाख रुपये किंमतीच्या भव्य सभामंडपाचा लोकार्पण सोहळा यावेळी हभप गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर, महंत सुनिलगिरी महाराज, आमदार शंकरराव गडाख यांचे शुभहस्ते व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली तर अंकुश महाराज कादे,गणेश महाराज चौधरी, सुखदेव महाराज मुंगसे, भैय्यासाहेब देशमुख, कारभारी जावळे,कॉन्ट्रॅक्टर रामचंद रेपाळे, एकनाथ कावरे,अशोक गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी कारभारी चेडे, पांडुरंग रक्ताटे, जनार्धन कदम, बन्सी मुंगसे,बाबासाहेब मुंगसे,दत्ता मुंगसे, सदाशिव पुंड महाराज उपस्थित होते.
यावेळी आमदार गडाख म्हणाले, तांबे वस्तीवरील नागरिकांच्या आग्रहाखातर धार्मिक कार्यात येणारी अडचण लक्षात घेता हा सभामंडप दिला आहे. येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे अतिशय सुंदर असे आयोजन करण्यात आले. डॉ. संदिप तांबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनाभाऊ तांबे, बंडूनाना तांबे, नवनाथ तांबे, अशोक तांबे,नेवासा तालुका सावता परिषदेचे अध्यक्ष संतोष तांबे,सोपान तांबे,तुळशीराम तांबे,राजू तांबे,भास्कर तांबे,चांगदेव तांबे,निवृत्ती तांबे, बाबासाहेब तांबे, बालू तांबे यांच्यासह संत सावता तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.यावेळी तांबे वस्ती सह देडगाव परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
