देडगावचे भूमिपुत्र गणेश मुंगसे यांचा नागरी सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र गणेश गोरक्षनाथ मुंगसे (लालगेट) यांची आरोग्य अधिकारी (लातूर) व कॅनॉल इन्स्पेक्टर (संभाजीनगर) या दोन पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक जनार्धन कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. यावेळी सागर बनसोडे सर ,पावन गणपतीचे विश्वस्त अशोक मुंगसे, कानिफनाथ गोफने मेजर यांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्कारास उत्तर देताना गणेश मुंगसे म्हणाले की, माझ्या यशामध्ये आई, वडील, भाऊ, चुलते यांनी मला मोलाचे मार्गदर्शन करत सहकार्य केले. याबद्दल मी घरच्यांचा व ग्रामस्थांचा ऋणी राहील. आजच्या सत्काराने मी भारावून गेलो असून मला मित्रपरिवारांनीही मोठे सहकार्य केले. आलेल्या संधीचे सोने करून जनतेची सेवा करीन त्याचबरोबर गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करील, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी विविध संघटनेच्या, शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या सत्कार समारंभप्रसंगी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, दत्तोबा मुंगसे , गणपत तात्या कोकरे, भानुदास  मुंगसे, रामभाऊ काजळे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, उपसरपंच महादेव पुंड, माजी चेअरमन संतोष तांबे, सूर्यभान सोनवणे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, विश्वस्त सुनील मुथ्था, काकासाहेब देशमुख, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी सरपंच दत्ता मुंगसे, पावन गणपतीचे अध्यक्ष संभाजी मुंगसे, संजय मुंगसे, बहिरनाथ एडके, विश्वस्त भाऊसाहेब मुंगसे, विजय चेडे, गोरक्षनाथ मुंगसे, राजू टेलर मुंगसे, अविनाश दळवी, भगवान मुंगसे, विलास मुंगसे, भिमराज मुंगसे, बहिरनाथ मुंगसे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनूस पठाण यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुंगसे यांनी मानले.