जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी राज्यभरातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार आहेत. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेत असाल तर हे पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार, हे तुम्हाला फक्त आधारकार्ड नंबर टाकून महाडिबीटीवर पाहता येणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून वापरून तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम येणार आहे.
यासाठी कोणतीही बँक डिटेल्स तपासले जाणार नाही. कारण डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे हे तुम्हाला तपासण्याची आवश्यकता आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्ज केलेल्या बऱ्याच जणांकडे एकाहून अनेक अकाऊंट असल्याने नक्की कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे, याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

आधार क्रमांक टाकल्याने तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो भरल्यानंतर त्यावर Bank Seeding Status असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि बँकेचे नाव दिसेल. आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल. आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे येणार आहेत.