दत्तात्रय कुटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वटवृक्षांची लागवड

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, माका ,पाचुंदा ,म ल हिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान परिसरात दत्तात्रय एकनाथ कुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या परिवाराने २१ वटवृक्षाची झाडे लावून एक आदर्शवत उपक्रम राबवला.
पावन महागणपती देवस्थान व बालाजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेली वृक्षारोपणाची चळवळ परिसरात कौतुकास्पद आहे. म्हणून कुटे परिवाराने अनावश्यक खर्चाला फाटा देत पावन गणपती परिसरात विविध संत व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपण केले.
यावेळी प्रदीप महाराज वाघमोडे म्हणाले, कुटे परिवाराने केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे. तसेच पावन महागणपती देवस्थान व बालाजी फाउंडेशन यांची वृक्षारोपणाची चळवळ कायमस्वरूपी चालत राहो व गणपती परिसरात नंदनवन व्हावे. हा परिसर वडाचा गणपती म्हणून ओळखल्या जावा, अशी अपेक्षा वाघमोडे महाराज यांनी केली.
वृक्षारोपण प्रसंगी हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप पांडुरंग महाराज रक्ताटे, बलभीम महाराज घोडके, प्रा. मुरलीधर दहातोंडे सर, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, राजेंद्र गटकळ, संभाजी कुटे, रघुनाथ कुटे, जगन्नाथ कुटे, गोरक्षनाथ कुटे, भानुदास कुटे, भाऊसाहेब मुंगसे, अनिल मुंगसे, पावन गणपती देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे, विश्वस्त अशोकराव मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे, बन्सी आप्पा मुंगसे ,आदिनाथ कुटे, भाऊराव टांगळ आदी वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.