संत माऊलीच्या संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल नवराष्ट्र रत्न पुरस्कार- 2024 प्रदान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नवभारत माध्यम समूहातर्फे आज नवराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 ने श्री संत माऊली पतसंस्थेचे संस्थापक सुनील शिरसाठ यांना गौरविण्यात आले. अहमदनगर येथे झालेल्या या सोहळ्यात मा. श्री. निलेश लंके (खासदार, अहमदनगर दक्षिण), मा. श्री. राम शिंदे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.श्री संग्राम जगताप (सदस्य, नगर शहर विधानसभा) , मा. श्री पद्मश्री पोपटराव पवार(कार्याध्यक्ष, आदर्श गाव समिती), मा.श्री यशवंत डांगे (आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका), मा. डॉ. सौ. सुधाताई कांकरिया (आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त), मा.श्री. प्रमोद कांबळे (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार व चित्रकार), मा.श्री डॉ.संजय कळमकर ( साहित्यिक तथा व्याख्याते) या प्रमुख अतिथींच्या हस्ते नवराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 ने श्री संत माऊली पतसंस्थेचे संस्थापक सुनील शिरसाठ यांना गौरविण्यात आले. अर्थसेवेसोबतच सामाजिक, धार्मिक क्षेत्रात संस्थेच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेस नवभारत तर्फे देण्यात येणारा नवराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 देऊन संस्थेच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यात आला. 365 दिवस अत्याधुनिक आर्थिक सेवा सुविधेसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून श्री संत माऊली मल्टीस्टेट (तिसगाव अर्बन) तिसगाव, पाथर्डी, कोरडगाव, ढोरजळगाव, तेलकुडगाव, भातकुडगाव, देडगाव या ठिकाणी अविरत कार्यरत आहे.संतांच्या शिकवणीवर चालत संस्थेचे संस्थापक श्री सुनील शिरसाठ यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व व्यापारी यांच्या आर्थिक गरजा दूर करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आर्थिक संस्था श्री संत माऊली पतसंस्था सुरू केली व फक्त यावरच न थांबता सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अविरत काम करत जबाबदार व्यक्तिमत्व ही प्रतिमा सत्यात आणली. त्यांच्या उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आणि समाजसेवेसाठी सर्व कर्मचारी वर्ग, सभासद, खातेदार, हितचिंतक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांना नवराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
अर्थसेवेसोबतच विविध योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील असंख्य गरजवंत व गुणवंत विद्यार्थ्यांना आणि बालिका समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अनेक शाळांतील मुला मुलींना वेळोवेळी शैक्षणिक मदत, विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व समजण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत बँकेच्या आर्थिक व्यवहार कार्यशाळेचे आयोजन करणे, तसेच विविध विमा योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य, विविध कार्यक्रमांतर्गत गावातील आदर्श जेष्ठ नागरिकांचा सन्मान करणे, झाडे लावणे ,सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्य करण्यास श्री संत माऊली मल्टीस्टेट (तिसगाव अर्बन) नेहमी सद्भावनेने तयार असते. ग्रामीण भागातील कोणत्याही धार्मिक कार्यासाठी  श्री संत माऊली संस्था नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. अनेक संकल्पना द्वारे समाजसेवेत योगदान देण्याचा संस्थेचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे.
सहकार आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल श्री संत माऊली (तिसगाव अर्बन) ला आजवर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.त्यामध्ये महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड 2021, ग्रामीण पत्रकार संघ पुरस्कार 2024, रायझिंग स्टार पुरस्कार 2022, छत्रपती संभाजीनगर गौरव पुरस्कार 2024 यासारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.नवराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे श्री संत माऊलीच्या कामगिरीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.