यावर्षी दसरा कधी साजरा करायचा? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् वेळ

सामाजिक

जनशक्ती (वृत्तसेवा)- दसरा किंवा विजयादशमी हा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आणि हिंदू कॅलेंडरनुसार, तो अश्विन किंवा कार्तिक महिन्यांच्या दहाव्या दिवशी येतो. मान्यतेनुसार या दिवशी प्रभू श्रीरामांंनी रावणाचा वध केला होता. तसेच तसेच दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानुसार वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतिक असलेला दसरा हा सण देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी शस्त्रांची पूजा करून मोठ्यांना आपट्याची पाने देऊ आशिर्वाद घेतला जातो. तसेच या दिवशी मोकळ्या मैदानावर रावण दहनाचे आयोजन केले जाते. यंदा अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी साजरी करण्यात येत आहे. तर दसरा कधी आहे, याबाबत अनेकांमध्ये गोंधळ आहे. यंदा दसरा कधी साजरा केला जाणार आहे, तसेच पूजेचा शुभ मुहुर्त काय आहे हे, जाणून घेऊया.यावर्षी दसरा 12 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी दशमी सुरू होईल तर 13 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी समाप्त होईल. 12 ऑक्टोबरला शुभ मुहूर्त दुपारी 2 वाजून 3 मिनिट ते 2 वाजून 49 मिनिटांपर्यंत आहे. तर पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 17 मिनिटे ते 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरातील लोक त्यांच्या खास शैलीत या सोहळ्यात सहभागी होतात. हा तो दिवस आहे ज्या दिवशी रामाने दहा मुखी रावणाचा वध केला होता. विजयादशमी हा हिंदू धर्मातील एक शुभ सण आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. देशातील प्रत्येक भागातील उत्सवांमध्ये स्वतःचे वेगळेपण आहे. या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता. तसेच दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी युद्धाला सुरूवात केल्यास विजय निश्चित असतो, असे मानले जाते. तसेच या काळात युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रपूजन केले जात असे. म्हणून दसऱ्याला शस्त्रांची पूजा केली जाते.