बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सागर बनसोडे यांची तर व्हा. चेअरमनपदी सुनीता जनार्दन मुंगसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदी सागर बनसोडे यांच्या नावाची सूचना माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे यांनी मांडली. त्यास संचालक कचरू तांबे यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन सुनीता मुंगसे यांच्या नावाची सूचना महेश कदम यांनी मांडली. त्यास संचालक संजय मुंगसे यांनी अनुमोदन दिले.
निवडीची प्रक्रिया बिनविरोध खेळीमेळीत पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून महाजन यांनी काम पाहिले. सचिव रामनाथ तांबे यांनी सहकार्य केले.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच महादेव पुंड, बाबासाहेब मुंगसे, संजय मुंगसे, योसेफ हिवाळे, रामनाथ गोयकर, रामेश्वर गोयकर, रामनाथ कोकरे, महेश कदम, रामदास तांबे, कचरू तांबे, संदीप कुटे, अरुण मुंगसे, जनार्दन मुंगसे, कुंडीलक दादा कदम, बाळासाहेब मुंगसे, मनोहर बनसोडे, अशोक मुंगसे, शिवाजी बनसोडे, पांडुरंग बनसोडे, काकासाहेब मुंगसे, सचिव रामनाथ तांबे, गणेश सूसे , हरिभाऊ गोफने, गोरख देवकाते, राजू अंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
