जनशक्ती (वृत्तसेवा)- शिर्डीच्या साईबाबांनी पाण्याने पणत्या पेटवून दिवाळी साजरी केली होती. साईबाबांचा हा चमत्कार व साक्षात्काराची आठवण म्हणून भाविकांनी साईंच्या शिर्डी येथील व्दारकामाईसमोर अकरा हजार दिवे पेटवून साई मेरे भगवान हा संदेश देत “देव दीपोत्सव” साजरा केला. शिर्डीत दीपावलीच्या पुर्वसंध्येला हा दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा असून यंदाही भावीकांनी यात सहभाग घेत हा दीपोत्सव अगदी आनंदात साजरा केला.
दिवाळी सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी म्हटलं की नजरे समोर येते ते म्हणजे पणती, दिवा आणि दिपोत्सव. दीपावलीच्या पुर्वसंध्येला भाविकांनी साईंच्या शिर्डी येथील व्दारकामाईसमोर अकरा हजार दिवे पेटवून दीपोत्सव साजरा केला. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधीकारी गोरक्ष गाडीलकर आदी मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
