तिसऱ्या कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड

देश विदेश

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला असून भारताने या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. आजचा दिवस भारतासाठी कभी खुशी कभी गम असा ठरला. शुभमन गिल आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात संघाची धावसंख्या 263 धावांपर्यंत नेली. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत 171 धावात न्यूझीलंडच्या 9 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला आहे. आता न्युझीलंडकडे एकूण 143 धावांची आघाडी असून उद्या सकाळी टीम इंडिया न्यूझीलंडचा राहिलेला एक फलंदाज किती झटपट बात करते, यावर टीम इंडियाला विजयासाठी किती धावांचा पाठलाग करावा लागेल हे स्पष्ट होईल. आज सकाळी शुभमन गिल व रिषभ पंत यांनी दमदार फलंदाजी केली. मात्र, इतर फलंदाजांना अपयश आल्याने भारताचा डाव लवकरच गडगडला. मात्र, त्यानंतर भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा व आर. अश्विन यांनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले.