बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत रोहिदास महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाराजांची आरती करण्यात आली व विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी शिक्षक संघटनेचे नेते संजयकुमार लाड सर, संत रोहिदास देवस्थानचे अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके, ज्ञानदेव मुंगसे (माऊली), संपत ससाणे, उत्तमराव तांबे, रवींद्र देविदास मुंगसे, संतोष दिक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजयकुमार लाड सर यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच त्यांचे विचार सध्याच्या काळातही कसे अनुकरणी आहेत, याची माहिती दिली. संत रोहिदास महाराज देवस्थानचे अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
